जोडगव्हाण येथील ग्रामसेवक निलंबित आर्थिक अनियमितता प्रकरण गट विकास अधिकारी सुदाम इस्कापे यांची कारवाई

वाशिम :२३ फेब्रु.- मालेगाव पंचायत समिती अंतर्गत जोडगव्हाण रामनगर या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अमोल पांडुरंग राजे ग्रामपंचायतीच्या व्यवहारात आर्थिक अनियमितता प्रकरणी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मालेगाव पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी सुदाम इसकापे यांनी ही कारवाई केली आहे. दिनांक २० फेब्रुवारी रोजी काढण्यात आलेल्या आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांनी गट विकास अधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर कार्यवाही केली असल्याचे म्हटले आहे. ग्रामसेवक अमोल राजे यांच्यावर ग्रामपंचायतीच्या व्यवहारात आर्थिक अनियमितता करणे, मासिक सभांना अनुपस्थित राहणे, वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना करणे, मुख्यालयी न राहणे आणि कर्तव्यात कसूर करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत. निलंबन काळात निर्वाह भत्ता व्यतिरिक्त इतर ग्रामसेवक राजे यांचे मुख्यालय मुख्य कोणत्याही प्रकारचे भत्ते अनज्ञेय कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद राहणार नाहीत. तसेच त्यांना निलंबन वाशिम यांचे निर्देशानुसार राहील असे काळात कोणत्याही प्रकारचा आर्थिक आदेशात नमूद आहे.. व्यवसाय करता येणार नसल्याचे त्यांना निलंबन काळात आदेशात नमद करण्यात आले आहे.